Pune News : वडगाव शेरीत नारळाच्या झाडावर वीज पडली

वडगाव शेरी येथील दाट लोक वस्तीच्या त्र्यंबकेश्वर सोसायटीतील नारळाच्या झाडावर आज सायंकाळी वीज कोसळली
Pune News : वडगाव शेरीत नारळाच्या झाडावर वीज पडली

वडगाव शेरी : वडगाव शेरी येथील दाट लोक वस्तीच्या त्र्यंबकेश्वर सोसायटीतील नारळाच्या झाडावर आज सायंकाळी वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर नारळाच्या झाडाने पेड घेतला. वीज कोसळण्याच्या घटने वेळी विजेचा दाब वाढल्याने परिसरातील काही टीव्ही फ्रीजही जळाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

Pune News : वडगाव शेरीत नारळाच्या झाडावर वीज पडली
Nashik Rain : इगतपुरीत मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह मुसळधार गारांच्या अवकाळीचे तांडव!

वडगाव शेरी, विमाननगर, नगर रस्ता परिसरात सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी वडगाव शेरी येथील त्र्यंबकेश्वर सोसायटीतील नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतला. वीज कोसळताना मोठा आवाज झाला. नारळाच्या झाडाने पेट घेतल्याने अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.

Pune News : वडगाव शेरीत नारळाच्या झाडावर वीज पडली
Weather Update : विजेच्या कडकडाटासह तळेगावात अवकाळी पावसाची हजेरी

अग्निशमन दलाने जागेवर येऊन आग विझवली. वीज पडली त्यावेळेस वीज पुरवठा ही खंडित झाला. परंतु त्यावेळी विजेचा दाब वाढल्यामुळे काही टीव्ही फ्रीज जळाल्याची माहिती स्थानिक रहिवासी प्रल्हाद कुदळे यानी दिली. दाट लोकवस्तीच्या या भागात घडलेल्या या अनपेक्षित घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com