ज्ञानोबा-तुकोबांच्या स्वागतासाठी वरुणराजाची हजेरी

चिंचवड सह औंध, सांगवी परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. चिंचवड परिसरात बुधवारी संध्याकाळ पर्यंत ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली
weather update sant Dnyaneshwar maharaj and sant tukaram maharaj palkhi rain in wari to pandharpur pune
weather update sant Dnyaneshwar maharaj and sant tukaram maharaj palkhi rain in wari to pandharpur punesakal

पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. पुणेकरांसह वरुणराजानेही संतांच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सकाळपासून शहर व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ होते. तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

चिंचवड सह औंध, सांगवी परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. चिंचवड परिसरात बुधवारी संध्याकाळ पर्यंत ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर लवळे येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला. शहरातील सरासरी कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील आठवडाभर तरी आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शुक्रवार नंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com