Pune Weather : राज्यात राजकारण तर, पुण्यात वातावरण तापले 

Weather-Is-Warm-in-pune.jpg
Weather-Is-Warm-in-pune.jpg

पुणे : थंडीला सुरवात होणाऱ्या नोव्हेंबरच्या सुरवातीलाच राज्यातील राजकारण तापत असतानाच पुण्यातील वातावरण तापल्याचे जाणवत आहे. पुण्यात गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले. 

राज्यात विधान सभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होऊन 17 दिवस झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना गेल्या चोवीस तासांपासून वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच पुण्यात मात्र कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा अंशतः कमी झालेला होता.

पहाटे गारठा जाणवत होता. त्याच वेळी आकाश अंशतः ढगाळ असल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदला जात होता. मात्र, चार दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. आकाश निरभ्र असल्याने कमाल तापमान वाढत आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. 7) 29.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे कमाल तापमान रविवारपर्यंत 31.6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये 1.9 अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com