निवडणुकीसाठीचे संकेतस्थळ "हॅंग' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - निवडणूक प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी, यासाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरण्याची सोय निवडणूक आयोगाने केली असली, तरी अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या इच्छुकांच्या तक्रारी आहेत. संकेतस्थळ "हॅंग' होणे, सविस्तर माहिती देऊनही ती न स्वीकारणे, तातडीने प्रतिसाद न मिळणे, अशा अडचणी अर्ज भरताना येत असल्याचे इच्छुकांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात "मदत कक्ष' सुरू केला असून, त्या माध्यमातून या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यात येत आहेत, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरून त्याची मूळ प्रत प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याकरिता http://panchayatelection.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने 27 जानेवारीपासून इच्छुकांनी अर्ज भरण्यास सुरवात केली आहे; मात्र संकेतस्थळ "ओपन' होण्यास वेळ लागत असल्याचे आढळून येत आहे. संकेतस्थळावरील सर्व रकाने भरणे आवश्‍यक आहे; मात्र त्यातील माहिती भरताना ती स्वीकारण्यास वेळ लागत असल्याने या प्रक्रियेसाठी चार ते पाच तास लागत असल्याचे एका इच्छुकाने सांगितले. महा ई-सेवा केंद्रांमध्येही यंत्रणा वेगवान नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात 
आले आहे. या पार्श्‍वभूमीवर तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी मदत कक्ष सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे, तरीही अर्ज भरण्याची ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी म्हणाले, ""ऑनलाइन अर्ज भरताना ज्या अडचणी येतील, त्या तातडीने दूर करण्यात येत आहेत. 
येत्या दोन दिवसांत अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने या प्रक्रियेत गोंधळ निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.''

Web Title: Website hang for elections