इंजिनिअरिंग डिप्लोमा अ‍ॅडमिशनचे वेळापत्रक येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता

मीनाक्षी गुरव
रविवार, 2 ऑगस्ट 2020

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने अभियांत्रकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येते. यंदा कोरोनामुळे दहावीचा निकाल उशीरा लागला असला, तरी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया त्यापूर्वीच सुरू झाली. मात्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत होते. त्या पार्श्वभूमीवर ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुणे : तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) येत्या आठवड्यात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र (फॅसिलिटेशनसेंटर) सुरू करण्याबाबत राज्यातील पॉलिटेक्निकचे प्राचार्य आणि संचालक यांना सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने अभियांत्रकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येते. यंदा कोरोनामुळे दहावीचा निकाल उशीरा लागला असला, तरी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया त्यापूर्वीच सुरू झाली. मात्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत होते. त्या पार्श्वभूमीवर ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकालाच्या काही दिवस आधी, तर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात आली. मात्र, पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत राज्यातील विद्यार्थी व पालकांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. मात्र आता येत्या आठवड्यापासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका, तसेच थेट द्वितीय वर्ष पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे डीटीईने कळविले आहे.

इंदापूर कॉलेज झालं डिजिटल; विद्यापीठाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सगळ्यांत पहिला उपयोग

या प्रवेश प्रक्रियेची पूर्व तयारी करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालक डॉ.अभय वाघ यांनी राज्यातील पॉलिटेक्निकचे प्राचार्य आणि संचालकांना पुरेसे मनुष्यबळ, कम्प्युटर, तांत्रिक सुविधा, पायाभूत सुविधांचा वापर करुन सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) उभारण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचेही आदेश दिले आहे. सरकारच्या निर्णयाप्रमाणे प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया डीटीईकडून राबविण्यात येणार आहे. या आठवड्यात दोन्ही प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याने  विद्यार्थी आणि पालकांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. 
 

'फूड सेफ्टी' लायसन्सच्या रिन्युअलला 'या' तारखेपर्यंत मुदत...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This week schedule for engineering diploma admission by DTE likely to be announced