पुणे : ५० टक्के उपस्थितीच्या बंधनावर वीकेंडच्या प्रयोगांची मात्रा

शनिवार-रविवारच्या प्रयोगांनी तारले निर्मात्यांचे आर्थिक गणित
Drama
Dramasakal

पुणे : बालगंधर्व असो किंवा यशवंतराव चव्हाण, टिळक स्मारक असो वा भरत नाट्य मंदिर, शहरातील प्रत्येक नाट्यगृहांमध्ये सध्या विकेंड (Weekend)अर्थात शनिवार-रविवारी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. नाट्य प्रयोग आणि संगीत मैफिलींच्या बुकिंगने जवळपास सर्वच नाट्यगृहांमधील दिवसभरातील स्लॉट भरले आहेत. सध्या ५० टक्के (50% attendance)उपस्थितीच्या बंधनाने उत्पन्नाची नाडी मंदावली असताना विकेंडच्या प्रयोगाची रामबाण मात्रा निर्मात्यांना तारून नेत आहे.(New Corona Rules)

Drama
कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहांमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे आधीच उत्पन्नात घट होते. त्यात आठवड्यातील कामाच्या दिवसांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम लावल्यास ५० टक्के प्रेक्षकही उपस्थित नसतात. परिणामी खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी वेळ निर्मात्यांवर येते. याउलट शनिवार व रविवारी कार्यक्रमांचे, नाटकांचे प्रयोग लावल्यास प्रेक्षकही गर्दी करतात. गेल्या काही दिवसांमध्ये तर यातील बहुतांश प्रयोग हाऊसफुल्ल होत असल्याचा अनुभव निर्मात्यांना आला. म्हणूनच विकेंडला अधिकाधिक प्रयोग करून खर्चाचा ताळमेळ जुळवण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. याशिवाय, कलाकारांची उपलब्धता, हेही विकेंडला आयोजित होणाऱ्या प्रयोगांमागील एक महत्त्वाचे कारण ठरते आहे. नाट्यगृहे बंद असल्याच्या काळात अनेक कलाकार सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणात व्यस्त झाले होते. नाट्यगृहे खुली झाल्यावर दोहोंचा मेळ साधण्यासाठी आठवडाभर चित्रीकरण व आठवड्याच्या शेवटी नाटयप्रयोग, असे नियोजन अनेकांनी केले. परिणामी शनिवार-रविवारकडे बहुतांश कार्यक्रमांचे नियोजन होत आहे.(Impact of the COVID-19 on the performing arts)

Drama
ओमिक्रॉनचा भारतात एक बळी,जगात किती? आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट

येत्या आठवड्याच्या अखेरीस देखील हेच चित्र आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘तिला काही सांगायचंय’, ‘अ परफेक्ट मर्डर’ आदी व्यावसायिक नाटके, ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘नाइन्टीज हटके’ हे सांगितिक कार्यक्रम येत्या शनिवारी व रविवारी शहरातील विविध नाट्यगृहांमध्ये सादर होणार आहेत. कोरोनाचे निर्बंध कायम असेपर्यंत हाच कल कायम असेल, अशी चिन्हे आहेत.

संचारबंदीमुळे रात्रीचे प्रयोग बंद

एरवी २६ जानेवारीसारख्या सार्वजनिक सुट्टीच्या आदल्या दिवशी तसेच शुक्रवारी रात्री ९-९.३० च्या सुमारास आयोजित नाट्य प्रयोगांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. हे प्रयोग रात्री ११.३०-१२ पर्यंत संपतात. परंतु, दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने रात्री उशिरापर्यंत प्रयोगाला थांबण्याची प्रेक्षकांची तयारी असते. मात्र सध्या रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रयोगांचे आयोजन थांबले आहे. याही कारणामुळे आता विकेंडच्या प्रयोगांखेरीज दुसरा पर्याय निर्मात्यांसमोर नाही, असे नाट्य व्यवस्थापक समीर हंपी यांनी सांगितले.(Pune News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com