

Holiday weekend traffic chaos in Lonavala affecting commuters and tourists
sakal
लोणावळा : उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा वीकेंड असल्याने कार्ला फाटा, एकवीरा देवी मंदिर आणि कार्ला लेणी परिसरात रविवारी (ता. ७) पर्यटक व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. परिणामी, कार्ला फाटा ते मळवली दरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला.