खाण्या-पिण्याची मजा आणि शॉपिंगही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

‘विकेंड प्लॅन’साठी मॉल्सना पसंती; मुलांना सांभाळण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी

पुणे - फुलराणीसारखी टॉय ट्रेन किंवा छोट्या बॅटरीच्या ऑपरेटेड कार... व्हिडिओ गेम्सपासून ट्राम्पोलिन, सॅंड पिट्‌स व अन्य खेळ व मनोरंजनाचे विविध पर्याय ‘मॉल’मध्ये उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे लहान मुले (अगदी दोन- अडीच वर्षे वयाचीसुद्धा) सांभाळण्यासाठी येथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आई- वडिलांनाही निवांतपणे खाण्या- पिण्याचा व शॉपिंगचा अनुभव घेता येतो. त्यामुळे शनिवार- रविवारचा ‘विकेंड प्लॅन’ मॉलमध्ये जाण्याचा आखला जात आहे.

शाळांना सुटी लागल्यानंतर आपल्या मुला- मुलींसाठी ‘समर कॅम्प’सह विविध प्रकारच्या कार्यशाळांना पाठवून ‘एन्गेज’ ठेवण्याची पालकांची लगबग असते. सकाळी व सायंकाळी असे वर्ग लावले तरी शनिवारी, रविवारी मुलांना कुठे घेऊन जायचे, असा प्रश्‍न पडतोच. शहरातील चांगल्या उद्यानांमध्ये मुलांना घेऊन जाण्याचा पर्याय आजही अनेक पालक निवडतात, मात्र मॉलप्रमाणे तिथे अन्य सोयी- सुविधा नसल्यामुळे काही पालकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. शहरातील पूर्व भागातील अनेक मॉल्समध्ये ग्राहक आकर्षित करण्यासाठी खास ‘किड्‌स गेम झोन’ तयार केले आहेत.

‘गेम झोन’मुळे दिलासा
मॉलमध्ये येण्यापूर्वी ग्राहक विचार करतात, ते म्हणजे मॉलचे पार्किंग उपलब्ध असेल का, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी मनोरंजनाचे काही साधन आहे का, मॉलमध्ये मिळणाऱ्या वस्तूंचे दर परवडणारे आहेत का आणि लहान मुलांना घेऊन आल्यास त्यांना कुठे खेळवायचे किंवा सोडायचे. आता मॉलमध्ये ‘गेम झोन’ उपलब्ध झाल्याने कोणीही निश्‍चिंतपणे शॉपिंग करू शकतात, असा अनुभव एका मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितला.

सुटीच्या दिवसी शहरालगत कोठेही जायचे म्हटले, तर वाहतूक कोंडी आणि गर्दीला सामोरे जावे लागते. सुटीचा आनंद घेण्यापेक्षा जाण्या- येण्यातच वेळ आणि पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यापेक्षा मॉलमध्ये गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आणि खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. या ठिकाणी आल्यावर दोन ते तीन तास कसे निघून जातात, कळतही नाही आणि कामाच्या तणावातून रिलॅक्‍स झाल्यासारखे वाटते.
- सुजय दातार, पालक

मॉल व्यवस्थापनाने लहान मुलांना सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे मुलांचे टेन्शन राहत नाही. थोडे महाग पडत असले तरी ‘फॅमिली’ म्हणून एकत्र वेळ घालवण्याच्या दृष्टीने ही ठिकाणे आमच्यासाठी सोयीची ठरतात. मोठ्या सुट्यांमध्ये मात्र आम्ही दूरच्या प्रवासाचे नियोजन करत असतो.
- धनश्री सावंत, पालक

Web Title: weekend & shopping