पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजारांबाबत `या` आहेत नियम व अटी

जनार्दन दांडगे
Friday, 5 June 2020

"मिशन बिगीन अगेन" या मोहीमे अंतर्गत जिल्ह्यातील कंन्टेंमेन्ट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) वगळता गाव पातळीवरील सर्व प्रकारचे आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी (ता. ४) रात्री उशीरा दिले आहेत.

उरुळी कांचन (पुणे) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागिल त्र्यांऐंशी (८३) दिवसापासून बंद असलेले गावपातळीवरील आठवडे बाजार आज (शुक्रवार) पासून पुन्हा सुरु होणार आहेत. "मिशन बिगीन अगेन" या मोहीमे अंतर्गत जिल्ह्यातील कंन्टेंमेन्ट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) वगळता गाव पातळीवरील सर्व प्रकारचे आठवडे बाजार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी (ता. ४) रात्री उशीरा दिले आहेत. या आदेशामुळे शेतकरी व सर्वसामन्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

दरम्यान "मिशन बिगीन अगेन" या मोहीमे अंतर्गत गावपातळीवरील आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी मिळाली असली तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी आठवडे बाजारात येणाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क वापरणे यासारख्या आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालण करण्याच्या अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन न झाल्यास, अटीचे उल्लघंन होणारे आठवडे बाजार तात्काळ बंद करण्यात येतील असेही नवल किशोर राम यांनी आदेशात स्पष्ठ केले आहे. 

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तेरा मार्च रोजी गावपातळीवर भरणारे सर्वच प्रकारचे आठवडे बाजार बेमुदत बंद करण्याचे आदेश दिले होते. गावपातळीवर भरणारे आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका छोट्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. खेडेगावातील अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी शेतातील भाजीपाला आठवडे बाजारात स्वतः विक्री करुन उपजिवीका करतात. तर दुसरीकडे थेट शेतकऱ्याकडुन भाजीपाल्याची विक्री होत असल्याने, सर्वसामान्यांना भाजीपालाही स्वस्त मिळत होता. मात्र आठवडे बाजार बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र राज्य शासनाच्या लॉकडाउन समाप्त करणे व निर्बंध कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या "मिशन बिगीन अगेन" या मोहीमे अंतर्गत नवल किशोर राम यांनी वरील आदेश दिले आहे.  

आठवडे बाजार सुरु करण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी-
१) आठवडे बाजारात येणारे शेतकरी व्यापारी व ग्राहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक
२)  आठवडे बाजारात तंबाखू, गुटखा, पान खाण्यास व थुंकण्यास सक्त मनाई
३) शेतकरी, विक्रेते व ग्राहक यांच्यात किमान सहा फुटांचे अंतर आवश्यक
४) आठवडे बाजाराची जागा व बाजारातील दुकानांचे ग्रामपंचायतीकडुन निर्जुतुकीकरण आवश्यक.
५) आठवडे बाजारात य़ेणारे व जाणारे अशा सर्वांचे थर्मल स्कॅनिंग, हात धुणे व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक.
६) आठवडे बाजारात बसणाऱ्या विक्रेत्यांच्या जागा सहा फुटाचे अंतर राखून असाव्यात. 
७) आठवडे बाजाराची वेळ, दिवस व पार्किंग याबाबत ग्रामंपंचायत व स्थानिक पोलिसांनी ठरवाव्यात. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दरम्यान आठवडे बाजारात वरील नियमांचे पालन न झाल्यास, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार आठवडे बाजार तत्काळ बंद करण्याबरोबरच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नवल किशोर राम यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly market started in Pune district