भीमाशंकर साखर कारखान्याचे वजनकाटे तपासणीत बिनचूक

सुदाम बिडकर
शनिवार, 7 एप्रिल 2018

पारगाव (पुणे): दत्तात्रेयनगर- पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजनकाटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी दिला आहे.

पारगाव (पुणे): दत्तात्रेयनगर- पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजनकाटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुण्याच्या वैधमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने कारखानास्थळावर अचानक भेट देऊन वजन काट्यांची तपासणी केली. या वेळी उसाने भरलेले ट्रक व बैल गाड्यांच्या वजनाची कसून तपासणी केली. उसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणित असल्याची शहानिशा केली. या वेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. त्यामुळे वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाचे पुणे विभागाचे वैधमापनशास्त्र सहायक नियंत्रक एन. पी. उदमले व जुन्नर विभागाचे वैधमापन निरीक्षक शेख यांनी दिला. याबाबतचा अहवाल भीमाशंकर कारखान्याला दिला. या वेळी ट्रॅक्‍टर, वाहनचालक विजय कारके, भीमराव बढे आदी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील संस्थापक- अध्यक्ष असलेल्या भीमाशंकर साखर कारखान्याने देशात सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा तीन वेळा पुरस्कारासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी बाजारभाव देत शेतकऱ्यांचे नेहमी हित जोपासले आहे. यापूर्वीही अनेकदा भीमाशंकर साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी केली असता वजनकाटे बिनचूक असल्याचा अहवाल तपासणी पथकाने दिला आहे.

Web Title: The weight loss check of Bhimashankar sugar factory is perfect