वजन कमी झालेच पाहिजे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

पुणे - निवडणुकीच्या रणधुमाळीत वेळीअवेळी जेवण आणि ताणतणावांमुळे पोटाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी वजन घटविणाऱ्या वैद्यकीय उपचारांना इच्छुकांकडून पसंती दिली जात आहे. आहाराची पथ्ये, सौम्य व्यायाम करण्याबरोबरच झटपट उपायांसाठी ‘कोलोन हायड्रोथेरपी’सारखे नवे उपायही अवलंबिले जात आहेत.

पुणे - निवडणुकीच्या रणधुमाळीत वेळीअवेळी जेवण आणि ताणतणावांमुळे पोटाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी वजन घटविणाऱ्या वैद्यकीय उपचारांना इच्छुकांकडून पसंती दिली जात आहे. आहाराची पथ्ये, सौम्य व्यायाम करण्याबरोबरच झटपट उपायांसाठी ‘कोलोन हायड्रोथेरपी’सारखे नवे उपायही अवलंबिले जात आहेत.

प्रचाराच्या धामधुमीत शारीरिक आरोग्य जपण्याचे आव्हान इच्छुक उमेदवारच नव्हे, तर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारीही या त्रासाने ग्रस्त असतात. चांगला आहार आणि नियमित व्यायाम हेच यावरील रामबाण उपाय असले तरी त्याचे काटेकोर पालन करणे दैनंदिन जीवनात शक्‍य होतेच असे नाही. कितीही चांगला आहार घेण्याचा प्रयत्न केला तरी सध्याच्या जीवनशैलीत शरीरामध्ये विषारी घटकांची निर्मिती होतच राहते, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

शरीराची रचनाच अशी असते की अनावश्‍यक विषारी घटक दररोज, वेळोवेळी बाहेर फेकण्याची प्रक्रिया आत होते; या प्रक्रियेनंतरही काही विषारी घटक शिल्लक राहतात. ते घटक बाहेर फेकण्यासाठी पर्यायी सुविधेची गरज भासते. ‘कोलोन थेरपी’ म्हणजे आतड्यातील अनावश्‍यक आणि विषारी घटक औषधाशिवाय बाहेर फेकून आतडे शुद्ध करण्याची सुरक्षित आणि परिणामकारक पद्धत आहे. त्याचा वापर राजकारणी, पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात करत आहेत.

कोलोन थेरपीविषयी माहिती देताना हिलिंग हॅंड्‌स क्‍लिनिकचे डॉ. अश्‍विन पोरवाल म्हणाले, ‘‘कोलोन हा पाच ते सहा फूट लांबीच्या आकाराचा भाग आतड्याला संलग्न असतो. शरीरातील उर्वरित पाणी शोषून घेत आणि आपल्या आहारातील काही घट्ट पदार्थ लहान आतड्याच्या मार्गाने वाहून नेत पचन प्रक्रिया पूर्ण होऊन अनावश्‍यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी शरीर सज्ज होत असते. आतड्यातील तापमान आणि दाबाचे संतुलन राखण्याचे काम शुद्ध पाण्याच्या प्रवाहाद्वारे केले जाते. रेचक औषधांसारख्या पारंपरिक औषधांपेक्षा कोलोन थेरपी फायदेशीर ठरते.’’

‘कोलोन थेरपी’मध्ये एका पातळ नळीच्या माध्यमातून शरीरातील अथवा आतड्यातील अनावश्‍यक पदार्थ, गॅसेस, चिकट आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे पोट मोकळे होते.
- डॉ. अश्‍विन पोरवाल

Web Title: The weight must be less!