esakal | घोडेगाव व परिसरात विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत.
sakal

बोलून बातमी शोधा

विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत

घोडेगाव व परिसरात विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव

घोडेगाव : घोडेगाव ता.आंबेगाव व परिसरातील 56 गावात गणेशाचे मंगलमय वातावरणात आगमन झाले. घोडेगाव येथे सतरा सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची विधीपूर्वक स्थापना केली तसेच घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 87 गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली.

हेही वाचा: पुण्यात गणेशोत्सवाची धूम; पाहा व्हिडिओ

गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...अशा जयघोषात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला वाजतगाजत घरी नेले. उत्साह व मोठ्या भक्तीभावाने आज गणरायाची घरोघरी प्राणप्रतिष्ठा केली गेली. साहेब पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली ५० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अगोदरच मंडळांना सूचना केल्यामुळे प्रत्येक मंडळाने काळजी घेऊन गणेशाची स्थापना केली.

हेही वाचा: पुण्यात गणेशोत्सवाची धूम; पाहा व्हिडिओ

घोडेगाव येथील कुंभार वाडा गजबजून गेला होता. घोडेगाव व परिसरात दोन हजार अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती कलाकारांनी यावर्षी छोट्या मूर्ती बनवल्यावर भर दिल्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे मोठे नुकसान झाले नाही. स्टॉल्सवर आज सकाळपासूनच लोकांची बाप्पांना घरी नेण्यासाठी लगबग सुरु होती. बाप्पांच्या मूर्ती खरेदीसोबतच सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी आबालवृध्दांची सकाळपासूनच धावपळ सुरु होती.

आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गेल्या काही दिवसांपासूनच तयारी सुरु होती. आज तो क्षण आल्यानंतर वाजत गाजत बाप्पांचा जयघोष करत सर्वांनीच घराघरातून बाप्पाची प्रतिष्ठापना केली. पूजाअर्चा व घराघरातून आरत्यांचा आवाज दुमदुमत होता.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवात अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई

यंदा गणेशमूर्तींसह सजावटीच्या साहित्याच्या किंमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र तरीही या भाववाढीचा बाप्पांच्या भक्तांवर त्याचा जराही परिणाम जाणवला नाही. तितक्याच उत्साह व आनंदाने घरोघरी बाप्पांची विधीपूर्वक स्थापना केली गेली. दुचाकीसह चारचाकी वाहनातून बाप्पांना लोकांनी घरी नेले.

नारोडी गिरवली, चिंचोली, धोंडमाळ शिंदेवाडी, गोनवडी ,लांडेवाडी, पिंगळवाडी ,कोळवाडी, काळेवाडी यास 56 गावात गणेशाची स्थापना झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वांनीच मास्क परिधान करुनच खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंगचा मात्र सगळीकडे फज्जा उडाला होता. प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केलेले होते. मात्र अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

loading image
go to top