कोरोनाची लढाई जिंकलेल्यांचे पहा कसे झाले स्वागत

manchar
manchar
Updated on

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार घेणारे कोरोनाचे १३ रुग्ण बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या वेळी त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये वडगाव काशिंबेग गावचे सात, फदालेवाडी गावातील तीन आणि गिरवली, वळती, एकलहरे येथील प्रत्येकी एक रुग्ण गेली चौदा दिवस उपचार घेत होते. या एकूण १३ जणांनी कोरोना आजारावर मात केली आहे. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच, भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या सहा रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांनाही लवकरच घरी सोडले जाईल, असे डॉ. सुरेश ढेकले यांनी सांगितले.  

बरे झालेल्या रुग्णांना शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील, वडगाव काशिंबेगचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब पिंगळे आदींच्या हस्ते गुलाब पुष्प देण्यात आले. त्यानंतर या रुग्णांना गहिवरून आले. तसेच, या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय अधिकारी आणि भीमाशंकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीरंग फडतरे, राहुल पावडे, सचिन शिंदे आणि अन्य कर्मचाऱ्यांचे ऋण रुग्णांनी व्यक्त केले.

प्रशासनाने गेली 14 दिवस आमची योग्य प्रकारे काळजी घेतली. दररोज सकाळ- संध्याकाळ जेवण व नाष्ट्याची व्यवस्था केली. सतत आम्हाला हसत व प्रसन्न ठेवण्यासाठी डॉक्टर व परिचारिका आम्हाला धीर देण्याचे काम करत होत्या. आईवडिलांप्रमाणे आमची त्यांनी काळजी घेतली, अशा भावना हॉस्पिटलमधूनबाहेर पडताना रुग्णांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com