वाल्हेत संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

valhe
valhe

वाल्हे : ब्रम्ह सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला' असा टाळ-मुदूंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा गजर करत, वाल्हे(ता.पुरंदर) येथे संत सोपानकाका 'पंचक्रोशी प्रदक्षिणा' पालखी सोहळ्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा जेजुरी मुक्कामानंतर वाल्हे येथे न्याहरीसाठी विसावला.


आज पहाटे जेजुरी येथुन निघालेला पालखी सोहळा धिम्या गतीने वाल्हेकडे मार्गस्थ झाला.वाल्हे येथे सकाळी सात वाजता आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले.तदनंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन न्याहरीसाठी वाल्हे येथील महर्षि वाल्मिकी मंदिराच्या प्रांगणामध्ये विसावला. येथे वाल्हेचे सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तीमय आणि उत्साहपुर्ण वातावरणात सोहळ्यातील वैष्णवांचे दत्तोपंत पवार, शांताराम दुर्गाडे, संतोष नवले, सुनिल पवार, दत्तात्रय वाघमारे, पोपटनाना पवार, नारायण पवार, गणेश दुधाळ, भालचंद्र भुजबळ, बंटी पवार, राजेंद्र काळंगे, उमेश भुजबळ, विनायक पवार आदिंनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

दरम्यान यावेळी वाल्हेचे माजी सरपंच दत्तात्रय पवार यांच्या हस्ते संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. याप्रसंगी सोहळ्यातील 
वैष्णवांना वाल्हे ग्रामस्थांच्या वतीने वैषणवांच्या अंघोळ व अल्पोपहाराची तर कोळविहिरे ग्रामस्थांच्या वतीने सुगंधी दुधाची सोय करण्यात आली होती.तर पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने देखील भाविकांसाठी पाण्याच्या टॅकरची सोय उपलब्ध केली होती. ग्रामपंचायतीतर्फे दिंडीप्रमुख हभप.माऊली कदम, बापुसाहेब डफळ यांसह चोपदार,विणेकरी आदिंचा सत्कार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com