esakal | पुणे : आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

sakal_logo
By
बाबा तारे

औंध: भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज आणि पद्मावती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.आठवी ते बारावी या वर्गाच्या सर्व स्तरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याच्या सरकारी परवानगीनंतर भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

हेही वाचा: सातारा: दागिने पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीस अटक

यावेळी संस्थेचे सचिव विराज धनकुडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा भोसले, प्राचार्या दिपाली शिरगावे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख कोमल शिंदे,कला विभागाच्या प्रमुख वैशाली सांगलीकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. जवळपास सतरा महिन्यांच्या कठीण कालावधीनंतर विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह बघून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आनंदित झाले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे यांनी कोरोना नियमांचे पालन करुन शाळा भरविण्यास सर्वांना दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळा भरविण्यात आली.

loading image
go to top