Ashadhi wari : इंदापूरमध्ये संत तुकोबांच्या पालखी सोहळाचे स्वागत

इंदापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले
Welcome to Palkhi ceremony of Saint Tukoba in Indapur
Welcome to Palkhi ceremony of Saint Tukoba in Indapur

वालचंदनगर - जगत््गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज बुधवार (ता. २९) रोजी इंदापूर तालुक्यामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी साडेचार वाजता संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यामध्ये दाखल झाला.

शेरपुलावरुन पालखी इंदापूर तालुक्यात प्रवेश करताच ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करण्यात आला. पालखी सोहळ्यासोबतच्या लाखो वैष्णवांच्या साक्षीने इंदापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दोन वर्षानंतर पालखी सोहळा भवानीनगरमध्ये आल्यानंतर नागरिकांनी भक्तीभावाने पालखीचे स्वागत केले. पालखी रथावरती पुष्पांची उधळण करण्यात आली.

भवानीनगरमध्ये पालखी सोहळा येतामध्ये श्री छत्रपती भवानीनगरमधील श्री छत्रपती मुलींच्या हायस्कुलमधील मुलींनी स्वागत करुन कारखाना स्थळावर पालखी सोहळा विसावला.भवानीनगर,सपकळवाडी,लाकडी,निंबोडी परीसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी सोहळ्यातील वैष्णवांची कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांची सोय केली.

स्वागतसाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, बाळासाहेब पाटील,सर्जेराव जामदार, दिपक निंबाळकर, पांडुरंग दराडे, गणेश झगडे, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, निवृत्ती सोनवणेमाजी संचालक भाऊसाहेब सपकळ , कामगार नेते युवराज रणवरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन समितीच सदस्य सचिन सपकळ, विक्रम निंबाळकर, पार्थ निंबाळकर, यशवंत नरुटे,वसंत जगताप, प्रांतधिकारी दादासाहेब कांंबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील,गटविकासधिकारी विजयकुमार परीट,वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे उपस्थित होते.

भवानीनगरच्या विसाव्यानंतर पालखी सोहळ्या सणसरच्या मुक्कामाकडे रवाना झाला. सणसर गावामध्ये सणसरकरांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागताची तयारी करण्यात आली होती. गावामधील पालखी तळावर पालखी सोहळा विसावल्यानंतर हिंगणेवाडी,मानकरवाडी,जाचकवस्ती परीसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सणसरचे सरपंच रणजित निंबाळकर,उपसरपंच ज्योत्सना भाेईटे,अमोल भोईटे, अभयसिंह निंबाळकर उपस्थित होते.

सणसरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा गुरुवार (ता. ३०) अंथुर्णेकडे मुक्कामाला जाणार असून इंदापूर तालुक्यामध्ये पालखी सोहळ्याचे सहा मुक्काम असून सणसर,अंथुर्णे,निमगाव केतकी,इंदापूर शहर व सराटीच्या मुक्कामांचा समावेश असून ५ जुलै रोजी पालखी सोहळा सोलापूर जिल्हात प्रवेश करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com