रोपटे भेट देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

रमेश मोरे
सोमवार, 18 जून 2018

जुनी सांगवी : नवा गणवेश, नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नव्या वह्या, नवा उत्साह, नवखेपणातील कुतुहल अशा उत्साही वातावरणात रांगोळीच्या पायघड्यांनी जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्येही अनोखा उत्साह होता. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला रोपटे भेट देऊन विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते. शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला. नव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशव्दार आणि हातात रोपट्यांची भेट यामुळे चिमुकले भारावले होते. नव्या मुलांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेबद्दल आपुलकी वाटावी, या हेतूने मुलांचे कौतुक करण्याबरोबरच स्वागत करण्यात आले. यावेळी अतूल शितोळे यांनी रोपटे भेट देताना वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते. फोटो ओळ- जुनी सांगवी येथे अरविंद ऐज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांचे रोपटे देवुन स्वागत करताना माजी स्थ्यायी अध्यक्ष अतुल शितोळे व विद्यार्थी.

Web Title: Welcome to visit the plant to be students