

Ecological Warning: Odonata Diversity Shrinks Despite 143 Species Recorded
esakal
पश्चिम घाटात करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणातून या प्रदेशातील जैवविविधतेबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. संशोधकांना या काळात ऐतिहासिक नोंदींनुसार असलेल्या एकूण ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) प्रजातींपैकी फक्त ६५ टक्के प्रजातींचे दस्तऐवजीकरण करता आले. म्हणजे, पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कीटकांच्या ज्ञात विविधतेमध्ये जवळपास ३५ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.