महत्वाची बातमी : काय आहे कोविड-19चे आणि अश्वगंधाचे कनेक्शन; वाचा सविस्तर

covid.jpg
covid.jpg

पुणे ः कोरोनाला कारणिभूत सार्स कोविड-19चे पुनरुत्पादन अश्वगंधा आणि मधमाशांच्या मेनातून मिळणाऱया तेलामुळे रोखले जात, असा दावा दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि जपानच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स इंडस्ट्रील सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी या संस्थांनी केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

असे रोखते कोरोनाला
- मनवी शरिरात सहसा न आढळणारे विथेनॉन (डब्ल्यूआय-एन) नावचा घटक अश्वगंधा वनस्पतीत आढळतो
- मधमाशांच्या पोळ्यातील मेनामध्ये कॅफिक अॅसिड असते.
- विथेनॉन आणि कॅफिक अॅसिड सार्स-कोविड-2 विषाणूवरील पुनरुत्पादनाला कारणीभूत एमप्रो या प्रथिनांवर हल्ला करते
- दोघांच्याही रचना परस्पर विरोधी असल्याने एमप्रो या प्रथिनाला हे दोनही घटक जखडून ठेवतात
- पर्यायाने विषाणूच्या पुनरुत्पादन रोखले जाते
- मानवी पेशीमध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश रोखण्यासाठी अश्वगंधा गुणकारी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधनाचे फायदे ः 
1) कोविड-19 वर औषध शोधण्याचा वेळ आणि पैसे यांची बचत होईल.
2) अश्वगंधा आणि मधमाश्यांचे मेन सहज आणि मुबलक प्रमाणावर उपलब्ध
3) नैसर्गिक घटक असल्यामुळे साईड इफेक्ट कमी
4) प्रतिकारशक्तीही या घटकांमुळे वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत

संशोधनाच्या मर्यादा
- शोधनिबंध नुकताच प्रकाशकांकडून स्विकारण्यात आला आहे, परंतू अजून त्यावर संपादन आणि प्रकाशन बाकी
- प्रयोगशाळेतील स्तरावर असलेले संशोधनाच्या प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्या बाकी 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुर्वेदामध्ये अश्वगंधाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने त्यांची औषधीगुमधर्म पुन्हा एकदा तपासायला हवे. कोविड संदर्भात उपलब्ध जनुकीय माहितीच्या आधारे आम्ही हे संशोधन पुर्ण केले आहे.
-डॉ. डी. सुंदर, संशोधन समन्वयक, आयआयटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com