Video : पूरग्रस्तांसाठी नेमकी काय मदत द्यावी? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांसाठी नेमकी काय मदत द्यावी? जाणून घ्या
- सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाच्यावतीने मदत संकलन केंद्राची स्थापना करण्यात आहे. 
- जुने कपडे देवू नये. नवे कपडे द्यावे. 
- नाशवंत नाही असे पदार्थ द्यावेत. बिस्किट पुडे, चहा पावडर पदार्थ द्यावे. रेडी टु इट मॅगीचे पदार्थ द्यावेत
- पाण्याचे 2 ट्रक सांगलीला पाठविले आहेत. आणखी पाठवणार आहोत. 
- शाली, चादर, पांघरायाच्या वस्तू स्विकारल्या जातील
- दान करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये निधी जमा करावा. 

पुणे :  पुरग्रस्तांमध्ये स्थलांतरींताचा आकडा 2 लाख 85 हजार 261 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  प्रामुख्याने यामध्ये सांगली आणि कोल्हापुरच्या पुरग्रस्तांचा सहभाग आहे.  सांगली 1 लाख 34 हजार 119 तर कोल्हापुरमध्ये 1 लाख 11 हजार 365 एवढे स्थलांतरी लोक झाले असून त्यांची 94 आणि 171 केद्रांत सोय करण्यात आलेली आहे. दरम्यान मृत्यूंची संख्या 29 असून 11 व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती आहे.

दरम्यान पूरग्रस्तांसाच्या मदतीसाठी नेव्ही आणि एअर फोर्सचे हेलीकॉप्टर मदतीसाठी आणले आहेत. राज्य शासनाने घरांच्या पडझडसाठी किंवा घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत त्यासाठी शहरामध्ये 15000 रुपये आणि ग्रामीण भागात  10000 रुपये मदत जाहीर केली असून त्यासाठी 76 कोटींचा निधी दिला आहे. दरम्यान हा निधी जिल्हा स्तरावर वाटप केला असून पुढे वाटप होणार आहे. पुराचे पाणी ओसरले असून आता  औषध, पाणी, अन्न पुरवण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, पूरग्रस्तांसाठी नेमकी काय मदत द्यावी? म्हैसेकर यांनी माहिती दिली

पूरग्रस्तांसाठी नेमकी काय मदत द्यावी? जाणून घ्या
- सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाच्यावतीने मदत संकलन केंद्राची स्थापना करण्यात आहे. 
- जुने कपडे देऊ नये. नवे कपडे द्यावे. 
- नाशवंत नाही असे पदार्थ द्यावेत. बिस्किट पुडे, चहा पावडर पदार्थ द्यावे. रेडी टु इट मॅगीचे पदार्थ द्यावेत
- पाण्याचे 2 ट्रक सांगलीला पाठविले आहेत. आणखी पाठवणार आहोत. 
- शाली, चादर, पांघरायाच्या वस्तू स्विकारल्या जातील
- दान करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये निधी जमा करावा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What exactly should help provide for flood victims?