G20 Pune : ज्यासाठी संपूर्ण पुणे शहर सजलंय ते G20 नेमकं आहे तरी काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

G20 Pune

G20 Pune : ज्यासाठी संपूर्ण पुणे शहर सजलंय ते G20 नेमकं आहे तरी काय?

G20 Pune : पुणे शहर सध्या G20 आणि त्यासाठी चाललेल्या स्वच्छतेसाठी चर्चेत आहे. मात्र ज्यासाठी हे सगळं चाललंय ते G20 नेमकं आहे तरी काय तुम्हाला माहितीये? आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. हा जगातला प्रमुख विकसित आणि विरसनशिल देशांचा राष्ट्रगट आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.

पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.

सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे. मात्र 2008 च्या आर्थिक संकंटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख वर्षापासून एकदा G20 लीडर्स समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले.

कोण आहेत G20 राष्ट्रगटाचे सदस्य

अर्जेंटिना

इंडोनेशिया

सौदी अरेबिया

ऑस्ट्रेलिया

भारत

दक्षिण आफ्रिका

ब्राझील

इटली

तुर्की

कॅनडा

जपान

ब्रिटन

चीन

दक्षिण कोरिया

अमेरिका

फ्रांस

मेक्सिको

युरोपियन युनियन

जर्मनी रशिया

भारतासह अशा एकून 19 देशांचा समावेश यात आहे. युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे.

हेही वाचा: G20 Summit 2023 Pune: G-20 परिषदेला आजपासून सुरुवात, नारायण राणेंनी केले उद्घाटन

G20 राष्ट्रगटाचे महत्व

याचं महत्व म्हणजे जगातली 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहाते. जागाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतं

जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे. G20 हे जी-7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारीत रूप मानलं जातं.

विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे.