काय आदेश दिला माधुरी मिसाळ यांनी नगरसेवकांना?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

पक्षसंघटनेच्या कामात बेशिस्तपणा दाखविणाऱ्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांबाबत शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता पक्षात नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

पुणे - पक्षसंघटनेच्या कामात बेशिस्तपणा दाखविणाऱ्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांबाबत शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता पक्षात नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पाच जिल्ह्यांच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्यामध्ये येत्या वीस डिसेंबरपर्यंत बूथ, प्रभाग आणि मंडल स्तरावरील निवडणुका पूर्ण कराव्यात आणि या निवडणुका पन्नास टक्के पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शहराध्यपदाची निवड होणार नाही, अशा सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र शहरातील कोणत्याही मतदारसंघात ठरलेल्या नियोजनानुसार निवडणुकांची प्रक्रिया पार पडलेली नाही. प्रदेशाध्यक्षांनी दिलेली मुदत संपण्यास आता केवळ एक आठवडा राहिला आहे.

आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आज शिवाजीनगर, खडकवासला आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघांतील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. 

त्यासाठी मतदारसंघातील नगरसेवक, मतदारसंघाचे अध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना बोलाविले होते. परंतु, या बैठकीला अनेक पदाधिकारी व नगरसेवक वेळेत पोचले नाहीत; तर काहीजण फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या शहराध्यक्षांनी या सर्वांना ‘कारणे दाखवा’ नोटीस द्या, असे आदेश दिल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What ordered Madhuri Misal to the corporator