गुलटेकडी येथील मार्केट यार्ड कमिटीने काय घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

चीनवर भाव अवलंबून
बांगलादेश, फिलिपिन्स, थायलंड देशातून मागणी वाढल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. देशात प्रथमच गुंटूर बाजारात मोठ्या घडामोडी होत आहेत. दर वर्षी जानेवारीच्या सुरुवातील नवीन लाल मिरची बाजारात आल्यानंतर भाव कमी होतात. परंतु सध्या ते स्थिर आहेत. येत्या काही दिवसांत चीनमध्ये कशी खरेदी होईल यावर भाव अवलंबून असणार आहे.

बाजार समितीचा आदेश
मार्केट यार्ड - गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाला आणि फळे चीनमधून आयात केली जात आहेत. मात्र, सध्या तेथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चीनमधून आयात होणारी फळे आणि भाजीपाला कोरोना विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र संबंधित अडते व व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आतापर्यंत एका हजारापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चीनमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडले जात आहे. पुणे बाजार समितीच्या आवारात चीनमधून विविध फळे, भाजीपाला विक्रीस येतो. हा शेतीमाल कोरोना विषाणूमुक्त असल्याची तपासणी अन्न व भेसळ, औषध प्रशासन या विभागाकडून संबंधित अडते व व्यापाऱ्यांनी करावी. त्याबाबतचे प्रमाणपत्र फळे व भाजीपाला विभागाला सादर केल्यानंतरच या मालाची विक्री करण्याची यावी, असे बाजार समितीने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

पुण्यात राज ठाकरे यांनी घेतली बाबसाहेब पुरंदरे यांची भेट: या मुद्दयांवर झाली चर्चा 

लाल मिरचीच्या निर्यातीवर संकट
कोरोना विषाणूंमुळे चीनकडून लाल मिरचीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देशातील मिरची निर्यातीवर संकट आले असून, गेल्या पाच दिवसांत लाल मिरचीचा भाव १९०-२०० रुपये प्रतिकिलो वरून १२०-१२५ रुपयांपर्यंत घसरला आहे.

यंदा देशात एकूण ३.२५ ते ३.५० कोटी पोती उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. भारतातून दर वर्षी मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची निर्यात केली जाते. चीन हा मिरची खरेदी करणार सर्वांत मोठा ग्राहक देश आहे. त्यानंतर बांगलादेश, श्रीलंका, फिलिपिन्स आणि थायलंड या देशामध्ये भारतीय लाल मिरची खरेदी केली जाते. लाल मिरचीची खरेदी प्रामुख्याने घरगुती मसाल्याचे कारखानदार अधिक करतात. परंतु चीनमधील कोरोना विषाणूंचा मिरचीच्या बाजारावर परिणाम झाला आहे. लाल मिरचीचा भाव मोठ्या प्रमाणात घटला आहे. आतापर्यंत लाल मिरचीचा भाव किलोमागे दहा रुपये वाढण्यासाठी १०-२० दिवस लागायचे. परंतु सध्या बाजारात रोज मोठ्या घडामोडी होत आहेत, अशी माहिती दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष व मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What was decided by the Market Yard Committee at Gultekadi