Pune News : फ्रंटमार्जिन अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई कधी होणार

स्थानिक नागरिक ः हांडेवाडी, महंमदवाडी रस्त्यावर वाहतूककोंडी
When action be taken against frontmargin unauthorized traders Traffic jam on Handewadi Mahamadwadi road pune
When action be taken against frontmargin unauthorized traders Traffic jam on Handewadi Mahamadwadi road punesakal

उंड्री : सय्यदनगर-ससाणेनगर रेल्वे गेट क्र.७-हांडेवाडी आणि महंमदवाडी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फ्रंटमार्जिन आणि अनधिकृत व्यवसायिकावर धडक कारवाई करावी. मागिल दोन महिन्यांपासून स्थानिक नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी केल्या असून, प्रशासनाकडून आश्वासन दिले जात असून, कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा नागिरकांकडून केली जात आहे.

शहरामध्ये अतिक्रमण विभागाकडून फ्रंट मार्जिन आणि अनधिकृत हातगाड्यांवर अतिक्रमण कार्यवाही सुरू आहे. मात्र, सय्यदनगर, महंमदवाडी, हांडेवाडी रस्त्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन मुहूर्त शोधत आहे का, असा उपरोधिक सवाल संगीता डांगमाळी, रुपाली गायकवाड, गणेश जाधव, भाऊ देसाई यांनी उपस्थित केला आहे.

आशिष राऊत, संतोष सातव, निखिल हांडे, मनोज घुले म्हणाले की, हडपसर क्षेत्रिय कार्यालयामध्ये तक्रार दिल्यानंतर संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले जातात. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही,

अतिक्रमणप्रमुखाकडून त्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जातात. रस्तारुंदीकरण रखडले असून, त्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे, तर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अरुंद रस्त्यावर दाटीवाटीने हातगाड्या, फळभाज्या आणि भाजीविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. पदपथ शिल्लकच नाही, रस्ता वाहतुकीसाठी आहे, की व्यावसायिकांसाठी आहे.

-नितीन ताम्हाणे, हांडेवाडी रस्ता

हडपसर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार असेल, त्या दिवशी हातगाड्या बंद असतात. त्यानंतर राजरोसपणे अनधिकृत व्यावसायिकांशी आर्थिक हितसंबंध आहेत की काय,

अशी शंका स्थानिक नागरिक हडपसर नागरिक कृती समितीकडून उपस्थित केली जात आहे. मागील 3 आठवड्यापूर्वी वाहतूककोंडीत ससाणेनगर-हांडेवाडी रस्तावर पादचारी महिलेचा अपघात झाला, त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.

-मीनाक्षी थोरात, सय्यदनगर

अनधिकृत व्यावसायिक आणि वाहनांच्या गर्दीमुळे ध्वनी, वायू प्रदूषणामुळे दररोज अपघातसदृशस्थिती निर्माण होत आहे. वाहतूककोंडीत अडकल्यामुळे शाळकरी मुले, नोकरदारांना वेळेवर पोहोचताना कसरत करावी लागत आहे.

-अर्चना बनकर, महंमदवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com