
कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्सिनचे पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे.
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसिच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या अंतिम आदेशाची आता प्रतीक्षा आहे. लस वितरणाची सर्व जय्यत तयारी झाली असून, आज रात्री उशिरापर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत या बाबतचे अंतिम आदेश केंद्राकडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्या प्रमाणे लस वितरण देशात सुरू होईल.
"सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) आँक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्टाझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एसआयआय) विकसित झालेल्या कोव्हिशिल्डला आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वितरणासाठी परवानगी दिली. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व्ही. जी. सोमाणी यांनी दिली. त्यानंतर अकरा दिवसांनी आता लस वितरण होत आहे. या दरम्यान लशीची नेमकी खरेदी किंमत, कोणत्या कंपनीच्या किती लसी सरकार खरेदी करेल, त्याचे वितरण व्यवस्था कशी असेल, त्याचे लसीकरण कसे होईल याची तयारी या अकरा दिवसांमध्ये करण्यात येईल. ही तयारी आणि खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष लस वितरणाच्या टप्पा सुरू होत आहे.
हेही वाचा - नथुराम गोडसेबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्सिनचे पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. त्यासाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे वर्गवारी केली आहे. या लस वितरणाच्या मुख्य केंद्रावर पुण्यातून लस वितरित होणार आहे. त्यासाठी 12 ते 10 कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज ठेवले आहेत. केंद्राचा आदेश मिळताच हे ट्रक आकुर्डीवरून हडपसर येथील सिरम इन्स्टिट्युटमध्ये जातील. तेथे ट्रकमध्ये लशीचे डोस अपलोड होतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.