पोलिसांची वेबसाईट कधी होणार अपडेट?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

वेबसाईटवरील माहिती वेळोवळी अपडेट करण्यासह पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम कार्यरत आहे.
- शिरीष जाधव, पोलिस निरीक्षक, वायरलेस विभाग

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची वेबसाईट दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली. मात्र, त्यावर अद्यापही पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे डिजिटलच्या जमान्यात या वेबसाईटवर पुरेशी माहिती कधी उपलब्ध होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वच खासगी कंपन्यांसह शासकीय कार्यालयांनीही आपापल्या वेबसाईट सुरू केल्या आहेत. त्यात नागरिकांना माहिती, विविध निर्णय, सूचना, ऑनलाइन अर्ज भरणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, पोलिस आयुक्तालयाची वेबसाईट नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर तब्बल सव्वा वर्षाने वेबसाईट सुरू करण्यास मुहूर्त लागला. मात्र, प्राथमिक माहिती वगळल्यास इतर माहिती अद्यापही उपलब्ध होत नाही. तर काही विभागांची माहिती अपडेटही नाही. 

भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार 

वेबसाईटच्या दुसऱ्या पेजवर असलेल्या ‘आमच्या विषयी’ या विभागात आयुक्तालयातील ठाण्यांचा नकाशा असे नमूद आहे. मात्र, त्यावर क्‍लिक केल्यास कोणतीही माहिती उपलब्ध होताना दिसत नाही. अशीच स्थिती ‘पोलिस विभाग’ या अंतर्गत असलेल्या माहितीबाबत असल्याचे दिसून येते. ‘प्रसिद्धी पत्रक’ या शीर्षकावर क्‍लिक केल्यास त्यावर दैनंदिन माहिती न मिळता ठरावीकच माहिती उपलब्ध आहे. यासह तक्रारदाराला ऑनलाइन तक्रार करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासह वेबसाईटच्या पहिल्या पेजवर ‘आपले पोलिस ठाणे माहित आहे का’ असा कॉलम असून, यामध्ये आयुक्तालयांतर्गत असलेल्या ठाण्यांची माहिती मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या कॉलमवर क्‍लिक केल्यास लवकर व सहजरीत्या माहिती उपलब्ध होत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the police website update