esakal | अरण्येश्वर मंदिर व पर्वती पायथा येथील मुख्य रस्त्याना जोडणारा पूल कधी होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

अरण्येश्वर मंदिर व पर्वती पायथा येथील मुख्य रस्त्याना जोडणारा पूल कधी होणार?

sakal_logo
By
अजित घस्ते

सहकारनगर : आंबील ओढ्याला पूर येऊन दोन वर्षे झाली तरी स्थानिक नागरिकांना समस्याला सामोरे जावे लागत आहे.अरण्येश्वर मंदिर व पर्वती पायथा येथील मुख्य रस्त्याना जोडणारा पूल कधी होणार? असा सवाल  त्रस्त स्थानिक नागरिक करीत आहेत. आंबील ओढ्याच्या कडेला  सुरू असलेल्या पुलाच्या कामा बाबत  वारंवार प्रशासनाला जावे करून सुद्धा सुस्त प्रशासनाला जाग येईना अखेर स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यात उतरून ऐन दसरा  व दिवाळीच्या सणासुदीच्या काळात तरी पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत.

अरण्येश्वर मंदिर समोर सुरू असलेल्या पुलाच्या कामावर आंदोलन करून मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवला.यावेळी स्थानिक नागरिक रुपेश तुरे यांनी याबाबत पुढाकार घेऊन अरण्येश्वर मंदिर येथील काम सुरू असलेल्या पुलावर आंदोलन करून निषेध व्यक्त केला.यावेळी अरण्येश्वर देवालय ट्रस्टचे विश्वस्त रमेश कोतवाल,संभाजी कापसे,रविकांत भोसले,नितीन गोसावी, कौशिक साबळे, व्यापारी बाळासाहेब  डांगी,वसंत साळवे,तौसिफ सय्यद, गोविंद कुंभार इ. उपस्थित होते.यावेळी रुपेश तुरे म्हणाले, ऐन दसरा दिवाळीच्या सणासुदीच्या काळात तरी पुलाचे काम केव्हा पूर्व होणार का?पुलाचे काम संतगतीने सुरू असल्याने ये जा करता स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे ही आर्थिक नुकसान होत आहे यामुळे पर्वती व अरण्येश्वर मंदिर येथील पुलाचे काम लवकर करण्यात यावे यासाठी मनपा प्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर उतरून नागरिकांच्या मागणीसाठी उतरावे लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. सणासुदीच्या काळात तरी काम लवकर पूर्ण करावे.

हेही वाचा: ACB ची कारवाई; महिला मंडलाधिकारीसह 2 कोतवाल जाळ्यात

रमेश कोतवाल विश्वस्त,अरण्येश्वर देवालय ट्रस्ट), म्हणाले, नऊ महिने झाले पुलाचे काम संतगतीने सुरू असून पुलाचे काम लवकर करून पुलाची उंची वाढवली पाहिजे.मंदीरातील  येण्या जाण्यासाठी भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.मंदिरात यायचे म्हंटले की दोन किलोमीटर गोल वळसा घालून यावे लागते.यावेळी दिलीप अरुंदेकर म्हणाले, मित्र मंडळ चौक ते पर्वती दरम्यान जोडला जाणाऱ्या पुलाचे काम एप्रिल महिन्यामध्ये चालू करण्यात आले या कामाला आतापर्यंत नऊ महिने झाले तरी अद्याप काम झाले नाही.वारंवार महापालिकेच्या  अधिकाऱ्यांशी संपर्क करून सुद्धा अद्याप पण काम काही  केले नाही उलट आश्वासन देत काम लवकरात लवकर पूर्ण करू एवढेच सांगितले जात आहे म्हणून अखेर आंबील ओढ्यात उतरून आंदोलन करण्यात आले आहे. किमान याची दखल प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर पुलाचे काम पूर्व करावे.

हेही वाचा: बिर्याणी नव्हे यावेळी ट्राय करा हैदराबादी बैंगन

यावेळी व्ही. जी. कुलकर्णी ( पथ प्रमुख मनपा) म्हणाले, संबंधित ठेकेदारांना काम1पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत .अखरे महिन्याअखेर काम पूर्ण केले जाईल.अन्यथा संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल.

समस्या:

१)आंबील ओढ्याच्या कडेला राहत असलेल्या रहिवाशांना जोरदार पाऊस आला की धडकी भरते.भीतीने  रस्त्यावर उभा राहावे लागते.

२) 100 मीटरच्या अंतरावर जाण्यासाठी दोन किमी वळसा घालून जावे लागते.

३)पुलावरुन पाणी जाण्यासाठी पूल बांधण्याचे काम मात्र उंची वाढवण्याची मागणी

४) अरण्येश्वर मंदिर व पर्वती पायथा येथील मुख्य रस्त्याना जोडणारा पूल असल्याने सहकारनगर, पर्वती,तळजाई वसाहत, पद्मावती, तावरे कॉलनी, अरण्येश्वर ,संतनगर,लक्ष्मीनगर  भागातील नागरिकांना दोन किमीचे अंतर वळून यावे लागते.

loading image
go to top