आम्ही नेमके जायचे कुठे ? ड्रेनेज समस्याने आनंद पार्क त्रस्त

वडगावशेरी येथील आनंदपार्क सोसायटीच्या समोर कित्येक महिन्यापासुन ड्रेनेज पाणी साठून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे
आम्ही नेमके जायचे कुठे  ? ड्रेनेज समस्याने आनंद पार्क त्रस्त
आम्ही नेमके जायचे कुठे ? ड्रेनेज समस्याने आनंद पार्क त्रस्तsakal

रामवाडी : वडगावशेरी येथील आनंदपार्क सोसायटीच्या समोर कित्येक महिन्यापासुन ड्रेनेज पाणी साठून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.सर्वत्र दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीचे आगार हे ठिकाण बनले आहे. रहिवाशांनी कित्येक महिन्या पासुन घराच्या खिडक्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तळमजल्यावरील सदनिकेत मैलायुक्त पाणी आत येत आहे.आम्ही नेमके जावे कुठे या चिंतेने जेष्ठ नागरिक चंदा नाईक ग्रस्त झाल्या आहेत. प्रशासनाने ड्रेनेज लाईन कामे लवकरात पूर्ण करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

आनंद पार्क सोसायटीत 132 सदनिका आहे. बाजुला पुणे महानगरपालिकेचे अण्णा हजारे उद्यान आहे. गणेशनगर मार्गे येणारे पावसाचे पाणी आणि ड्रेनेज पाणी या ठिकाणी येऊन साचते.जोराचा पाऊस झाल्यावर हेच घाण पाणी तळ मजल्यावरील 12 सदनिकेत घुसते.

त्याच नाहक त्रास जेष्ठ नागरिकांसह घरातील लहान मुलांना होत आहे. डास खूपच वाढले आहे. दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. खिडक्या दरवाजे बंद ठेवावे लागत आहे. उद्यान बाजुला असुन ही नागरिकां आत जाता येत नाही. ड्रेनेजचे घाण व शेवाळयुक्त पाण्यामुळे रस्ता निसरडा बनला आहे. समाजप्रती कर्तव्य म्हणून सोसायटीचा वॉचमन येणार्‍या नागरिकां सतर्क करत आहे. ना मुलांना सोसायटीच्या आवारात खेळता येते ना बाजुच्या उद्यानात अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासनाने या गांभीर समस्या वर कायम स्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी सोसायटी चे रहिवासी करीत आहेत.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. आठ दिवसां पूर्वी आनंदपार्क सोसायटी समोरील साचलेला मैला गाळ उचलण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकारी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. लवकरात लवकर ड्रेनेज लाईनचे कामे होतील.

"उद्यानाच्या प्रवेश द्वारा समोर ड्रेनेज व पावसाचे पाणी साचल्याने उद्यानामध्ये जाता येत नसल्याने सोसायटीच्या सीमा भिंतीवरून उड्या मारून काही तरुण मंडळी आत जातात. एखाद्या वेळी तोल जाऊन अपघात घडू शकतो . त्यांना आत जाण्यास अडवणूक केल्यावर वॉचमन वर अरेरावी करीत आहेत."

-रोहित महाजन ,सोसायटीतील रहिवासी

"ड्रेनेज पाईपलाईनची कामे करताना काहीठिकाणी अडवणूक होत आहे अशा जागामालकांना पालिके कडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे."

- संदीप जऱ्हाड, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com