'रविवारी कोणती शाळा सुरू असते मुरलीधर भाऊ?'

'रविवारी कोणती शाळा सुरू असते मुरलीधर भाऊ?'

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पुणे मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी स्वत: मोबाईलमधून तिकीट काढून मेट्रोनेही प्रवास केला आहे. हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांनी आनंदनगर ते गरवारे कॉलेज पर्यंतचा मेट्रोचा 5 किमीचा प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोमधील काही दिव्यांग मुलांशी तसेच शालेय गणवेश परिधान केलेल्या मुलांशीही संवाद साधला आहे. मात्र, आता त्यांच्या याच कृतीवर जोरदार टीका होत आहे. तसेच त्यांच्यावर मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

'रविवारी कोणती शाळा सुरू असते मुरलीधर भाऊ?'
Modi in Pune: मराठीत भाषणाला सुरुवात; वाचा काय म्हणाले PM मोदी

मोदींनी या मेट्रो प्रवासात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. ज्यांनी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. मात्र, आज रविवार असतानाही ही मुले शाळेला का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात असून टीकाही केली जात आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामधील वाहतूक मार्गातील प्रत्येक दुकानं बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आल्यावरही टीका करण्यात आली आहे. एकीकडे शाळा उघडी नसताना मुलांना शाळेत पाठवलं जात आहे तर दुसरीकडे त्यांच्या पालकांना दुकाने बंद करायला लावली जात आहेत. मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नसतानाही ही इंव्हेंटबाजी कशासाठी? असा सवाल विचारण्यात येत आहे. तसेच मोदींनी या पूर्ण कार्यक्रमामध्ये एकाही ठिकाणी मास्क घातलेला दिसून आला नाहीये, त्यांच्या या कृतीवरही टीका करण्यात येत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.

त्यांच्या या कृतीवर व्हायरल होत असलेले मीम्स
त्यांच्या या कृतीवर व्हायरल होत असलेले मीम्स

याबाबत प्रश्न उपस्थित करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मोहसिन शेख यांनी म्हटलंय की, पुणे भाजपा बावचाळली आहे का? का पंतप्रधान मोदींना वेड्यात काढायचं ठरवलंच आहे? रविवारी कोणती शाळा सुरू असते मुरलीधर भाऊ? असा सवाल करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com