गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान ठेवणे गरजेचे : सहाय्यक पोलिस निरीक्षक बडवे

विजय मोरे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

गावातील शालेय विद्यार्थ्यांनी दम दाम दम या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी वेशाभूष केले होते. या स्पर्धेत क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मोहन गवळी यांनी मानले. 

उंडवडी : "तरुण मंडळानी गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान राखले पाहिजे. युवा पिढी सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात अडकत असून त्यांना थोर विचारवंताचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे आजच्या शाळेतील मुलांसह युवकांनी थोर विचारवंतांची आत्मचरित्र व पुस्तके वाचून त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास मदत होईल."  असे मत वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी उंडवडी सुपे येथे केले. उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील वेताळ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने "दम दाम दम" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी श्री. बडवे युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी सरपंच एकनाथ जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष मच्छिंद्र भगत, पोलिस पाटील सविता गवळी, ग्रामपंचायत सदस्या अंजना गवळी, माजी सरपंच संजय गवळी, धनंजय गवळी, वेताळ तरुण मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील गवळी, उपाध्यक्ष दिपक गवळी आदींसह महिला , ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. 

यावेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी दम दाम दम या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी वेशाभूष केले होते. या स्पर्धेत क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मोहन गवळी यांनी मानले. 

दरम्यान, दम दमा दम या कार्यक्रमात 'पार्वतीच्या बाळा' या गाण्याला पहिले बक्षिस पायल जगताप यांना देण्यात आले. तर दुसरा क्रमांक 'बोले चुडिया ' या गाण्याला कारखेल येथील तुकाई मित्र मंडळ , तिसरे बक्षीस ' श्री गणेशा' या गाण्याला माही गवळी, चौथे बक्षिस 'मी आमदार झाल्यासारखे वाटतयं या गाण्याला 'कृष्णा भगत यांना देण्यात आले. 

 

Web Title: While celebrating Ganeshotsav it is important to keep an eye on socialism API Badve