पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Who is Bhagwan Pawar: या प्रकरणात रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत राज्याच्या आरोग्यमंत्र्यावर टीका केली आहे. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
Who is Bhagwan Pawar
Who is Bhagwan Pawaresakal

Who is Bhagwan Pawar

नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे माझे निलंबन झाल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोप आरोप केले आहेत. तसेच एका जुन्या प्रकरणात चौकशी नेमूण आपलं निलंबन झाल्याची तक्रार देखील डॉ. भगवान पवार यांनी केली आहे.

माझे कामकाज व सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून व हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मंत्री महोदय यांनी मला पुण्यातील कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतू मी नियमबाह्य कामात मदत केली नाही म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे, असा आरोप भगवान पवार यांनी केला आहे.

भगवान पवार म्हणाले, मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझा मानसिक छळ सुरु होता आणि आरोग्य अधिकारी (प्रमुख), महानगरपालिका पुणे हे पद रिक्त करण्यासाठी माझ्या विरुध्दच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने २९ एप्रीलला समिती स्थापन करुन चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करुन मला निलंबित करणेत आलेले आहे.

प्रशासकीय चौकशी झालेली नाही तसेच आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे माझ्या कामकाजाबाबत प्रतिकुल शेरे नाहीत. तरी देखील शासनामार्फत माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाले. माझे निलबंन हे माझ्या विरुध्द तक्रारीमध्ये तथ्य नसतांनाही त्रास देण्याच्या हेतूने व माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्र्यांच्या दबावामुळे केलेले आहे.

या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावात आहे. निलंबन करित असताना, माझ्या सध्याच्या कार्यकालातील तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणने सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलबंन करुन माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागी भगवान पवार यांनी केली आहे.

Who is Bhagwan Pawar
Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी आखला होता डाव? राजकारणातील खळबळजनक दावा!

या प्रकरणात रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत राज्याच्या आरोग्यमंत्र्यावर टीका केली आहे. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला  पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Who is Bhagwan Pawar
बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com