
पुण्यातील गौरव अहुजा अश्लील कृत्य प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गौरव अहुजाचा भाग्येश ओसवालला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येरवडा घटनेतील आरोपी गौरव अहुजाचा भाग्येश हा मित्र आहे. भाग्येश हा अहुजाच्या गाडीत शेजारी बसला होता. पुण्यातूनच भाग्येश याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे गौरव अहुजाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्याची संपूर्ण पार्श्वभूमी समोर आली आहे.