

who is rupesh marne
esakal
पुणे, ता. २८ : कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा सक्रिय सदस्य रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी आज पहाटे मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून एका बंगल्यातून अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्यावर खंडणी, मारहाण, हत्या प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारी (मकोका) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.