वाकड पुलाला भेगा पडत आहेत याला जबाबदार कोण?

4Pune_Hinjewadi_IT_park_Road.gif
4Pune_Hinjewadi_IT_park_Road.gif

हिंजवडी (पुणे) : वाकड येथे अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वी नव्याने बांधलेल्या मुंबई-बंगळूरु महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा भरावही खचल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या काही महिन्यात भेगा पडल्या असून त्याला कोण जबाबदार असा जाब निलेश जगदाळे या नागरिकाने टिे्वटरवरुन विचारला आहे.  या ट्विटमध्ये त्यांने सुप्रिया सुळे, नितिन गडकरी, गिरिश महाजन, विवेक वेलणकर यांनाही टॅग केले आहे. 

लोकसभा निवडणुकांपूर्वीच अगदी घाईघाईत या पुलाचे उदघाटन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यानंतर हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलामुळे महामार्गावर नित्याने होणारी वाहूतककोंडी देखील कमी झाली होती. निकृष्ठ दर्जाचे काम असल्याने पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. तर म्हाळुंगेच्या बाजूने पुलाचा भराव खचला असून पुल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकृष्ठ व दर्जाहिन कामामुळे रस्ते विकास महामंडळाचे कोट्यावधी रूपये पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडूनच समांतर पुल उभारून घ्यावा अशी मागणी युवा लघुउद्योजक राम वाकडकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पुलाला तडे गेल्याने पुलावरील व पर्यायाने महामार्गाच्या सर्व्हीस रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अऩेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.आता प्रशासन याची दखल घेऊन पुलाच्या निकृष्ठ कामकाजास जबाबदार कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com