
gautami patil
esakal
गौतमी पाटीलच्या गाडीचा नवले पुलावर अपघात झाला होता. यावेळी एका रिक्षाला धडक बसली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. समाजी मरगळे असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांच्या मुलीने कारवाईसाठी सिंहगड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी चौकशी करून समाजी मरगळे यांची मुलगी अपर्णा मरगळे यांना पुरावे दाखवले.