यशवंतच्या‌ चेअरमनपदी‌ कुणाची वर्णी लागणार ? २७ मार्चला होणार निवड

दीड दशकानंतर झालेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सभासदांनी अण्णासाहेब मगर विकास‌ आघाडीवर विश्वास दाखवत २१ पैकी १८ जागांवर विजयी केले.
यशवंतच्या‌ चेअरमनपदी‌ कुणाची वर्णी लागणार ?
यशवंतच्या‌ चेअरमनपदी‌ कुणाची वर्णी लागणार ?Sakal

उरुळी कांचन : दीड दशकानंतर झालेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सभासदांनी अण्णासाहेब मगर विकास‌ आघाडीवर विश्वास दाखवत २१ पैकी १८ जागांवर विजयी केले. तर विरोधी अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या‌ पारड्यात तीन जागा टाकल्या.

यानंतर आता निवडून आलेल्या संचालकांमधून उद्या (बुधवार) कारखान्याचे चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड होणार आहे. या दोन पदांवर विजयी आघाडी कोणाला संधी देणार तसेच विरोधी पॅनल ही निवड बिनविरोध होऊ देणार की निवडणूक लढवणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

तेरा वर्षानंतर होणारी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीला सर्वपक्षीय नेत्यांनी बैठका घेवून प्रयत्न केले होते. मात्र या प्रयत्नांना अपयश आले आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल या दोन पॅनलमध्ये निवडणूक रंगली.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पॅनेलनी एकमेकांवर टीकेची झोड उठवत दावे प्रतिदावे केले. कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची आश्वासने दिली. मात्र, कारखान्याच्या सभासदांनी अण्णासाहेब मगर विकास‌ आघाडीवर विश्वास दाखवत २१ पैकी १८ संचालक निवडून दिले. तर रयतच्या पॅनेलचे केवळ तीन संचालक निवडून दिले.

एकेकाळी राज्यात आदर्श ठरलेला व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उत्कर्षाचा पाया ठरलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची गेली १३ वर्षापूर्वी बंद पडलेली सहकाराची घडी सावरण्यासाठी नवीन संचालक मंडळाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

शिवाय प्रदीर्घ कालावधीनंतर कारखान्यावर संचालक मंडळ नियुक्त झाल्याने सभासदांच्या अपेक्षांचे ओझे नवीन संचालक मंडळाला पेलावे लागणार आहे. तत्कालीन संचालक मंडळातील आपआपसातील वाद संस्थेच्या कसा मुळावर उमटला याचे साक्षीदार कारखान्याचे सभासद आहे.

निवडणुकीत दिलेल्या शब्दानुसार संचालक मंडळाला कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करता येणार नाही, या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीत सभासदांनी सत्ता दिलेल्या विकास‌ आघाडीला आपल्या विजयी संचालकांमधून एका कणखर संचालकाची चेअरमनपदी तर दुसऱ्या एका संचालकाची व्हाईस‌ चेअरमनपदी निवड करावी लागणार आहे.

ही निवड उद्या (ता. २७) कारखान्यावर होणार असून या दोन पदासाठी आघाडीचे प्रमुख कोणावर विश्वास दाखवतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे विरोधी रयत पॅनल ही निवडणूक बिनविरोध होऊ देते की निवडणूक लढवणार हे पहावे लागणार आहे.

नवीन चेेअरमन व संचालक मंडळाला यासाठी करावे लागणार काम :

- कारखान्याची धुराडी पुन्हा पेटण्यासाठी शासनाकडून व बँकांकडून निधी उपलब्ध करणे

- कारखान्यावरील थकित दीडशे कोटींचे कर्ज ओटीएस करणे

- अत्याधुनिक प्लॅन्ट उभा करणे

- सभासद व कामगारांची थकीत ५८ कोटींची देणी फेडणे

- कारखान्यावरील विविध सरकारी कर भरणे

- न्यायालयालयात सुरू असलेले अडीशेहून अधिक दावे निकालात काढणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com