esakal | पिंपरी-चिंचवड महामंडळे व शासकीय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार?
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

अस्तित्वाचा केविलवाणा प्रयत्न
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे पालिकेत अस्तित्व आहे. मात्र, काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कायकर्त्यांची महामंडळावर वर्णी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेमधील इच्छुकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे नेतृत्वाची राजकीय ओढाताण होणार आहे. शिवाय, गेल्या पाच-सहा वर्षांत अज्ञातवासात गेलेले माजी पदाधिकारी पत्रकबाजी करून अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड महामंडळे व शासकीय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महामंडळे व शासकीय समित्यांवरील फडणवीस सरकारच्या काळातील नियुक्‍त्या रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांना पायउतार व्हावे लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षही बदलले जाणार आहेत. त्यामुळे अशा संस्था, महामंडळांवर शहरातून कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

Video : पुण्यात फिरतेय महिला चोरट्यांची टोळी; ओढणीचा फास टाकून मारतेय डल्ला

आधीच्या युती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या शहरातील तीन कार्यकर्त्यांना राज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. यात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांना संधी दिली. मात्र, नियुक्तीनंतर अवघ्या एक वर्षांनी विधानसभा निवडणूक झाली आणि सत्तांतर झाले. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने वेगळी वाट धरत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी सलोखा केला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर दोन-अडीच महिन्यांतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वे महामंडळांवरील नियुक्‍त्या रद्द करण्याची घोषणा केली.

फुरसुंगीत बिबट्याचा थरार; गोठ्यातील वासरला फाडून खाल्ले

त्यानुसार शहरातील ॲड. पटवर्धन, खाडे यांची पदे गेली. उर्वरित महामंडळांबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. त्यात अण्णा भाऊ साठे महामंडळावरील नियुक्ती रद्द होऊ शकते. तसे, झाल्यास गोरखे यांनाही पद सोडावे लागणार आहे. 

प्राधान्य कोणाला?
सध्या नवनगर विकास प्राधिकरणाचा कारभार विभागीय आयुक्तांच्या हाती आहे. त्याच्या अध्यक्षपदासह लोकलेखा समिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, अल्पसंख्यांक विकास महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, राज्य परिवहन (एसटी) महामंडळ यांसह विविध महामंडळांवर नव्याने नियुक्‍त्या होण्याची शक्‍यता आहे. त्यात शहराला संधी मिळेल का? कोणाला मिळणार? आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यापैकी कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. 

पुणे-सोलापूर मार्गावर मेगाब्लॉक: 'या' चार गाड्या शनिवारी रद्द

यापूर्वीचे पदाधिकारी
नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद यापूर्वी काँग्रेसचे बाबासाहेब तापकीर यांनी भूषविले आहे. त्यांच्यानंतर सुमारे १५ वर्ष प्राधिकरणाचा कारभार विभागीय आयुक्तांच्या हातीच होता. दोन वर्षांपूर्वी भाजपचे सदाशिव खाडे यांना संधी मिळाली होती. मात्र, कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांना पद सोडावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे कट्टर समर्थक आझम पानसरे यांची अल्पसंख्याक विकास महामंडळावर वर्णी लागली होती.

loading image