रानडुक्करांचा आख्खा कळपच पडला विहिरीत

कुसेगाव (ता. दौंड)  : विहिरीत पडलेला रानडुक्कराचा कळप.
कुसेगाव (ता. दौंड) : विहिरीत पडलेला रानडुक्कराचा कळप.
Updated on

पाटस - उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वन्यजीवांना घोटभर पाणी अन् पोटभर चाऱ्यासाठी जिवावर बेतणाऱ्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय कुसेगाव (ता. दौंड) येथे गुरुवारी (ता. २५) आला. पाणी व चाऱ्याच्या शोधात शेतात आलेल्या नऊ रानडुक्कारांचा कळप विहिरीत पडल्याची घटना या ठिकाणी घडली. वनविभाग व पुणे येथील रेस्कू पथकाने पाच तासाच्या अथक प्रयत्नाने या रानडुक्कांना सुखरूप बाहेर काढले.

दौंड तालुक्यात देऊळगावगाडा, हिंगणीगाडा, पडवी, कुसेगाव आदी भागात वनाचे  क्षेत्र मोठे आहे. यामध्ये चिंकारा, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, ससा, मोर आदी वन्यप्राणी व विविध प्रजातीचे पक्ष आढळून येतात. मार्च महिना सध्या सरत आला असून उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती वन्यजीवांच्या मुळावर उठली आहे. वन्यजीवांना पाण्यासाठी सध्या मोठा संघर्ष करावा लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुसेगाव येथे वनक्षेत्राला लागून असलेल्या एका विहिरीत गुरुवारी नऊ रान डुक्करे पडल्याचे संबंधित शेतकऱ्याला आढळून आले. काही अंतरावरील शेतात या डुक्करांनी चारा पिकावर डल्ला मारल्याचे दिसून आले. विहीर खोल असल्याने या रानडुक्कारांना वर येणे अशक्य झाले.

संबंधित शेतकऱ्याने याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपाल चैतन्य कांबळे, वनरक्षक शशिकांत सावंत, पद्मिनी कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने पुणे येथील रेस्कू पथकाला पाचारण करण्यात आले. दौंड, पाटस, वरवंड येथील वनकर्मचाऱ्यांसह इको संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले. मात्र, विहीर खोल असल्याने रानडुक्करांना बाहेर काढणे कठीण होते. 

विहिरीच्या कठड्यावर थांबलेल्या लोकांना पाहून रानडुक्करांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या गुरगुरण्याने व ओरडण्याच्या आवाजाने परिसर हादरून गेला. मात्र, पथकाने विहिरीत पिंजरा सोडला. जोखीम घेऊन एका-एका डुक्कराला पिंजऱ्यात बंद केले. पाच तासाच्या अथक प्रयत्नातून सर्व रानडुक्करांना शिताफीने बाहेर काढून वन अधिकावासात सोडून देण्यात आले.

रानडुक्करांना वाचविण्यासाठी रेस्कू टिम, वनअधिकारी, कर्मचारी, इको संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोहीम यशस्वी केली. चारा व पाण्याच्या शोधासाठी सध्या वन्यजीव लोकवस्तीच्या परिसरात येत आहेत. नागरिकांनी वन्यप्राण्यांबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास वनविभागाशी संपर्क साधावा. 
- चैतन्य कांबळे,  वनपरिमंडल अधिकारी, दौंड

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com