CoronaVirus : भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार कशाची वाट पहातेय?

Why indian government waiting for to bring back the Indians from tehran
Why indian government waiting for to bring back the Indians from tehran

पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडविण्यासाठी केंद्र सरकार का तातडीने पावले उचलत नाही? कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची टांगती तलवार तेथील नागरिकांवर आहे. त्यातून त्यांच्या जिवाला धोका असतानाही केंद्र सरकार विमान पाठवून नागरिकांना भारतात का आणत नाही, असा सवाल तेथे अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इराणमध्ये कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही शेकडो भारतीय अडकले आहेत. त्यात कंपनीच्या कामासाठी तेहरान येथे गेलेले दोन तरुणांचाही समावेश आहे. त्यात मुंबई येथील वेदांत कदम (वय 24, वरळी) आणि अरविंद जाधव (वय 50 मुलुंड) हे देखिल तेथे अडकले आहेत.

याबद्दल बोलताना अरविंद यांच्या पत्नी सुषमा जाधव म्हणाल्या, "तेहरान येथून उड्डाण केलेल्या विमानांना भारतातील विमानतळांवर उतरू दिले जात नाही, अशी माहिती मिळत आहे. तेहरान येथून 28 तारखेला उड्डाण करून जाधव भारतात परत येणार होते. पण, ते विमान रद्द केले. आता 16 तारीख दिल्याचे समजते. म्हणजे पंधरा दिवस या भारतीय नागरिकांनी तेथे राहावे लागणार आहे. या दरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर, याची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे आहे का?'' इराणमधील नागरिकांना परत भारतात आणण्याचा निर्णय घ्यायला केंद्र सरकार इतकी वाट का पहातंय, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com