

sakal
-प्रज्वल रामटेके
पुणे: आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, वाहतूक नियमन तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड जवानांचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न वयोमर्यादेच्या अटीमुळे भंग पावत आहे. होमगार्ड म्हणून तीन वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण करेपर्यंत अनेक जवान भरतीसाठी निर्धारित वयोमर्यादा ओलांडत असल्याने ते भरती प्रक्रियेतून बाहेर पडतात. त्यामुळे पोलिस शिपाई भरतीत होमगार्ड जवानांना वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत देण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.