का कोसळताहेत पुण्यातील वाडे?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पुणे शहराचे एकेकाळचे वैभव असलेले जुने वाडे आज धोकादायक स्थितीत कसेबसे उभे आहेत. मुसळधार पावसात या वाड्यांमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन राहात आहेत. रोज एखाद्या वाड्याचा काही भाग कोसळून दुर्घटना घडत असताना या महत्त्वाच्या विषयाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

वाडे जुने झाल्याने ते खाली करण्याबाबत महापालिका मूळ मालक आणि रहिवाशांना नोटीस देत आहे; परंतु भाडेकरूंचा विचार करून वाड्यांच्या पुनर्विकासाच्या योजनेला गती देण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे वाड्यांचा विकास रखडला आहे. याच कारणामुळे रहिवासी आपले घर सोडत नाहीत. सर्व बाबींचा विचार करून महापालिकेने वाड्यासंदर्भात नवे धोरण आखायला हवे.
- स्वप्नील घाग, रहिवासी, कसबा पेठ

शहरातील जुन्या वाड्यांची पाहणी करण्यात आली असून, धोकादायक असलेल्या ४२३ वाड्यांना नोटीस दिलेली आहे. कोसळण्याच्या स्थितीतील वाडे तातडीने उतरविण्यात आले असून, ही कारवाई आता नियमित सुरू राहील. त्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे.
- युवराज देशमुख, अधीक्षक अभियंता, महापालिका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is Punes Wada collapsing