लायकी नसताना कर्ज का घेतले?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

वसुलीवर मिळते टक्केवारी  
कर्जाच्या हप्त्याची वसुली करण्याची जबाबदारी बऱ्याचदा फायनान्स कंपन्यांकडून खासगी व्यक्तींना दिलेली असते. हे लोक जेवढे वसुली करतात, त्यानुसार त्यांना टक्केवारीवर पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळविण्याच्या नादात ही मंडळी साम-दाम-दंड-भेद वापरून कर्ज वसुलीच्या मागे लागलेले असतात.

पुणे - लायकी नाही तर कर्ज घेतले कशाला, आमच्या विरोधात तक्रार करून काय साध्य होणार, आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा भाषेत फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या हप्त्यांची बेकायदा वसुली सुरू केली आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या निर्देशांना फायनान्स कंपन्यांनी हरताळ फासले असून, अरेरावी करून हप्ते वसुलीचा धडाका लावला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून, उद्योग-व्यवसायही ठप्प झाला आहे. नोकरदारांना कामावरून काढणे, सक्तीच्या रजेवर पाठवणे किंवा पगार कपात करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सप्टेंबरपर्यंत न भरण्याची सवलत ‘आरबीआय’ने दिली आहे. मात्र असे असताना कर्ज वसुली करणाऱ्या बाबूंकडून कर्जधारकांना पैशासाठी फोन केले जात आहेत. एवढेच नाही तर हप्ता दिला नाही तर अगदी त्यांची लायकी काढली जात आहे. 

'...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

वसुलीवर मिळते टक्केवारी  
कर्जाच्या हप्त्याची वसुली करण्याची जबाबदारी बऱ्याचदा फायनान्स कंपन्यांकडून खासगी व्यक्तींना दिलेली असते. हे लोक जेवढे वसुली करतात, त्यानुसार त्यांना टक्केवारीवर पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळविण्याच्या नादात ही मंडळी साम-दाम-दंड-भेद वापरून कर्ज वसुलीच्या मागे लागलेले असतात.

महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक  
फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात जो कर्जदार पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे किंवा ‘आरबीआय’ने दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करीत असेल त्याची बोलती बंद करण्यासाठी महिला कर्मचारी त्याकडे पैशाची मागणी करतात. एखादी महिला उर्मट भाषेत कर्जाचे हप्ते मागत असेल तर उगाच वाद नको म्हणून बऱ्याचदा कर्जदार पैसे भरून टाकतात.

मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी

अशी घ्या खबरदारी  

  • कंपनी प्रतिनिधीचा कॉल रेकॉर्ड करावा
  • त्यांना ‘आरबीआय’चे नियम सांगावेत
  • सप्टेंबरपर्यंत पैसे देणार नसल्याचा मेल करावा
  • अरेरावी केल्यास पोलिसांत तक्रार द्यावी
  • झालेला प्रकार कंपनीला मेलद्वारे कळवावा 
  • वसुलीसाठी घरी कोणाला येऊ देऊ नका

पुणे : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झेडपी मुख्यालयात उभारली स्वराज्य गुढी!

‘आरबीआय’च्या नियमाप्रमाणे सप्टेंबरपर्यंत कोणालाही कर्जाचा हप्ता मागता येत नाही. तसेच थेट खात्यातून पैसे कापणे बेकायदा आहे. त्यामुळे कर्जदार संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो किंवा ग्राहक मंचात  न्याय मागू शकतो.  
- ॲड. वाजेद खान-बिडकर

पैसे भरण्यासाठी मला रोज किमान १० कॉल व मेसेज येत आहेत. मी दिलेले चेक त्यांनी बॅंकेत भरले. ते बाऊन्स झाल्याने मला तीन हजार रुपयांचा फटका बसला. हप्ता दिला नाही तर त्याला व्याज लागेल, असे सांगितले जात आहे. 
- फिरोज शेख, कर्जदार

माझ्या दुचाकीचे चार हप्ते बाकी असून, ते लवकर भरा, अशी मागणी करणारे कॉल सध्या सुरू आहेत. पैसे भरले नाही तर गाडी घेऊन जाऊ, अशी धमकी मला देण्यात आली. 
- सुधीर शेळके, कर्जदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why take a loan when you are not qualified