
महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण काम अनेक महिन्यापासून रखडले
वाघोलीत पुणे नगर महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण काम अनेक महिन्यापासून रखडले
वाघोली : वाघोलीत हॉटेल पुष्कर समोरील पुणे नगर महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण काम अनेक महिन्यापासून रखडले आहे. या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असतानाही काम पूर्ण होताना दिसत नाही.
महाराष्ट्र रस्ते विकास हायब्रीड अँन्यूटी विकास कार्यक्रम अंतर्गत पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे. वाघोलीत हॉटेल पुष्कर समोर रखडलेल्या कामामुळे अनेक अपघात होत आहेत. काहींना तर जीवही गमवावा लागला आहे. त्याठिकाणी एकाच लेनची वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीचाही मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिसरात रस्ता एकेरी होत असल्याने भरघाव वाहन नियंत्रित होत नाहीत यामुळे अनेक अपघात घडतात. डांबर नसल्याने काम झाले नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी दिली. रखडलेल्या रस्त्यावर खडींचा खच पडलेला आहे.
हेही वाचा: हडपसर रेल्वे स्टेशन प्रवाश्यांची होतेय गैरसोय !
याच परिसरात आयव्ही इस्टेट कडे जाणारी उलटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. खडी असल्याने वाहन घसरण्याच्या घटना घडतात. तात्पुरते प्लास्टिक रॉड व बॅरिकेट्स या ठिकाणी लावण्यात आले आहे. पुणे नगर महामार्गावर प्रत्येक एका सेकंदाला एक वाहन जाते. एवढी प्रचंड वाहतूक असणाऱ्या महामार्गावर कामाचा एवढा निष्काळजी पणा होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
प्रचंड वाहतूक असणारा हा पुणे नगर महामार्ग आहे. मात्र तरीही निष्काळजी पणा दिसून येतो. प्रशासन ढिम्म असल्याने हे काम रखडले आहे. काम त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा अजून नागरिकांचे बळी जातील. - प्रकाश जमधडे, मनसे, वाघोली.
पावसाळ्यात डांबर उपलब्ध नसल्याने काम होऊ शकले नाही. आता डांबर प्लांट सुरू झाले असतील. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. - उज्वला घावटे , सहाय्यक अभियंता
Web Title: Widening Asphalting Pune Nagar Highway Wagholi Been Stalled Several Months
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..