धक्कादायक! बॉयफ्रेन्डसोबत मिळून पत्नीने रचला पतीला नपुसंक बनविण्याचा कट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

दोघांच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला नंपुसक बनवण्याचा त्यांनी कट रचला. पण, वेळीच नवऱ्याला त्यांचा कट समजला आणि तो सावध झाला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील वारजे माळवाडी भागात घडला. 

पुणे : 25 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंग तरुणीचे 27 वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणाशी काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नापुर्वी तिचे 22 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर तरुणावर प्रेम होते. लग्नानंतर काही दिवस दोघेही संपर्कात नव्हते पण, तरुणीला पुन्हा पहिले प्रेम आठवले आणि प्रियकरासोबत पुन्हा सुत जुळले. दोघांच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला नंपुसक बनवण्याचा त्यांनी कट रचला. पण, वेळीच नवऱ्याला त्यांचा कट समजला आणि तो सावध झाला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील वारजे माळवाडी भागात घडला. याप्रकरणी तरुणी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही उच्चशिक्षित असून मोठया कंपन्यात नोकरी करतात. काही महिन्यांपूर्वीच फिर्यादीचा तरुणीसोबत विधीवत विवाह झाला होता. पण लग्नापुर्वीच फिर्यादीच्या पत्नीचे आरोपीसोबत प्रेम संबध होते. मात्र, कुटंबातून विरोध होईल, वाद होईल त्यामुळे त्यांना विवाह करता आला नाही. त्यामुळे दोघांनी ऐकमेकांना विसरुन आयुष्यात पुढे जाण्याचे ठरवले. मात्र, विवाहनंतर काही दिवसांनी दोघे पुन्हा एकत्र आले. दोघांनी त्यांच्या प्रेमातील अडथळा दुर करण्यासाठी कारस्थानाला सुरवात केली. दोघांनी फिर्यादी याच्या गुप्तांगाची नस कापून त्याला नपुसंक बनविण्याचा प्लॅन केला. दोघेही हाईक मेसेंजनवर चॅटवर हा प्लॅन करत होते. फिर्यादी यांनी ते मेसेज वाचले आणि कटकारस्थान समजले. फिर्यादीने थेट वारजे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस करत आहे. 

अकरावी ॲडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wife conspired with the boyfriend to make the her husband impotent in pune