Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने शिक्षा सुनावली.
Court

Court

sakal

Updated on: 

पुणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पत्नीने न्यायालयात पतीविरोधातील आरोप नाकारले. मात्र, वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयाने पतीला दोषी ठरविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com