पुणे : प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

रमेश मोरे
शनिवार, 22 जून 2019

पुणे : हडपसर येथे दोन दिवसांपूर्वी मृतअवस्थेत आढळलेल्या सुरक्षारक्षकाचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने जबर मारहाण करुन खून केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे प्रियकराच्या साथीने पतीचा खून करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरास हडपसर पोलिसांनी बेडया ठोकल्या.

सरिता प्रकाश विलायतकर (वय 34, रा. फुरसुंगी, हडपसर),तारकेश तानाजी रणधीर (वय 25, रा. गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. प्रकाश शंकरराव विलायतकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सरिता व तारकेशचे प्रेमसंबंध होते. त्याविषयी तिचा पती प्रकाश विलायतकर यास कुणकुण लागली होती. त्यामुळे पती सरीता हिच्या चारित्र्यवर संशय घेऊन तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करीत होता. तसेच दोघाच्या प्रेमसंबंधत पती अडसर ठरत होता. या कारणामुळे सारिका व तारकेशचा प्रकाशवर राह होता. त्याच कारणातुन सारिकाने तारकेशच्या मदतीने जबर मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रकाशचा मृत्यु झाला होता. हदपसर पोलिस ठान्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या पथकाने आरोपीस अटक केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife murder Husband with the help of a boyfriend in Pune