पुणे - पतीनेच केला पत्नीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पतीने पत्नीस मारहाण करुन तिचा खुन केल्याची घटना नऱ्हे येथे घडली आहे. कोमल राहुल हंडाळ (वय 21) असे त्या महिलेचे नाव आहे. पती पत्नीतील वादामुळे ही घटना घडली, अशी शक्यता सिंहगड रोड पोलिसांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. 

खडकवासला (पुणे) : पतीने पत्नीस मारहाण करुन तिचा खुन केल्याची घटना नऱ्हे येथे घडली आहे. कोमल राहुल हंडाळ (वय 21) असे त्या महिलेचे नाव आहे. पती पत्नीतील वादामुळे ही घटना घडली, अशी शक्यता सिंहगड रोड पोलिसांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. 

खुनाच्या घटनेनंतर राहूल (पती) सकाळी घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने ही माहिती कोमलच्या नातेवाईकांना दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. 

कोमल ही एका खासगी हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करीत होती. त्या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर ती माहेरी गेली होती. पुन्हा आपली भांडणे होणार नाहीत असे सांगून तिला दोन दिवसांपूर्वी माहेरहून परत आणण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार घडला. 

Web Title: Wife murdered by husband at narhe pune