पिंपळवंडीला मानव-बिबट सहजीवन जनजागृती 

दत्ता म्हसकर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

जुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली. 

जुन्नर वन विभाग तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख, सहाय्यक वैदयकीय अधिकारी महेंद्र ढोरे, आकाश डोळस, बाबु नेहरकर, धोंडु कोकणे आदी उपस्थित होते.

डॉ.अजय देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बिबट जीवशास्त्र, बिबट्याचा स्वभाव तसेच स्वसंरक्षणार्थ घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती दिली. तसेच बिबट्या पासुन बचाव कसा करावा, बिबट्याच्या बछड्यांना त्यांच्या आई जवळ कसे सोडण्यात येते, विहिरीत पडलेल्या बिबट्यांना कसे बाहेर काढले जाते याची चित्रफीत दाखवण्यात आली. संगमनेर(ता.नगर) येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर कसे काढण्यात आले याविषयीचा देशमुख यांना आलेला थरारक अनुभव त्यांनी सांगितला. 

मुख्याध्यापक बोऱ्हाडे, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश क्षीरसागर, नितीन काकडे, सचिन फुलसुंदर, गणेश भुजबळ, विकास ढोबळे, संतोष ठाणेकर, स्वप्नील लेंडे, बाळासाहेब वामन, मोहसीन इनामदार, प्रशांत वामन व ग्रामस्थ उपस्थित होते. लक्ष्मण मंडलिक यांनी सुत्रसंचालन केले. पठाण यांनी आभार मानले.

Web Title: wild animal & residence awareness in pimpalwadi