वन्यजीव छायाचित्रणात व्यावसायिकता नको - बैस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - ""वन्य प्राण्यांच्या विश्‍वातील विविध घडामोडींचे दर्शन घडविण्यासाठी वन्यजीव छायाचित्रे ह एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र सध्या या छायाचित्रणांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी, तसेच सोशल मीडियावरील पोस्टसाठी केला जात आहे. या छायाचित्रणाकडे केवळ व्यावहारिकदृष्ट्या पाहिले जाऊ नये,'' असे मत वन्यजीव छायाचित्रकार अमोल बैस यांनी व्यक्त केले. 

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बैस बोलत होते. महोत्सावाचे वीरेंद्र चित्राव, छायाचित्रकार इंद्रनील बसू, सार्थक पाटील, अनिता किंद्रे, संग्राम गोवर्धने, स्वप्नील पवार, नितीन सोनावणे आदी उपस्थित होते. 

बसू म्हणाले, ""वन्यजीव छायाचित्रण ही एक अप्रतिम कला आहे. मात्र त्यासाठी केवळ जंगलात अथवा अभयारण्यातच जाऊन ती केली पाहिजे असे नाही. आपल्या सभोवतालीदेखील वन्यजीवांचे अनेक प्रकार असतात. केवळ त्यांना पाहण्याची दृष्टी असावी लागते.''

Web Title: Wildlife photography is not professionalism