Baramati News : वन्यजीवप्रेमींना गवताळ प्रदेशाची सफर करणे शक्य होणार

वन्यप्रेमींसाठी बारामती पंचक्रोशीतील गवताळ प्रदेशाची सफर व वन्यजीवन जवळून अनुभवता येणे आता शक्य होणार
wildlife safari tourists wildlife lovers photographers opportunity to experience natural beauty forest
wildlife safari tourists wildlife lovers photographers opportunity to experience natural beauty forest Sakal

बारामती - वन्यप्रेमींसाठी बारामती पंचक्रोशीतील गवताळ प्रदेशाची सफर व वन्यजीवन जवळून अनुभवता येणे आता शक्य होणार आहे. या वन्यजीव सफारीच्या माध्यमातून पर्यंटक, वन्यजीव प्रेमी, छायाचित्रकार यांना वनक्षेत्रात माळरानावरील निसर्गसौंदर्य व वन्यजीव पर्यंटन अनुभवण्याची संधी या निमत्ताने उपलब्ध होणार आहे.

पुणे वनविभागाच्या वतीने या सफारीसाठी संकेतस्थळ विकसीत करण्यात आले असून उपवनसंक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, आशुतोष शेंडगे यांनी हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

बारामती, दौंड, इंदापूर, सासवड या ठिकाणी वनक्षेत्रात वैशिष्टयपूर्ण गवताळ परिसंस्था विकसीत झाली असून विपुल जैवविविधता आहे. या प्रदेशात वनक्षेत्रात पक्षीनिरिक्षण, वन्यजीव सफारी सुरु करण्यासाठी सातत्याने वनविभागाकडे मागणी होती. त्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी व बारामतीतील शिर्सुफळ येथे दोन ठिकाणी ग्रासलँड सफारी सुरु करण्यात आली.

या सफारीचे बुकींग ऑनलाईन पध्दतीने www.grasslandsafari.org या संकेतस्थळावर खुले करण्यात आले आहे. येथील वनक्षेत्रात चिंकारा, लांडगा, तरस, ससे, कोल्हा, खोकड या सह तीनशेहून अधिक माळरानावरील पक्ष्यांच्या प्रजातीही येथे आढळून येतात.

पर्यंटकांना स्थानिकांच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती मिळावी व रोजगार निर्माण व्हावा असा या मागचा उद्देश असल्याचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांनी सांगितले. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. संकेतस्थळ उदघाटन प्रसंगी अनुज खरे, पुष्कर चौबे, राजीव पंडीत, विनोद बारटक्के उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com